जळगाव(प्रतिनिधी) : – नुकताच 2025 12वी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.अमेय ललित चौधरी 95% अनम अखिल पटेल 93.4% श्रेया नितीन पाटील 90.4% या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव आदरणीय गोदावरी आजी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर ,सचिव डॉ. वर्षा पाटील, ,संचालिका डॉ. केतकी पाटील ,हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, न्यूरोलॉजिस्ट डॉ. अनिकेत पाटील, डॉ.अक्षता पाटील आणि शाळेच्या
प्राचार्य सौं. नीलिमा चौधरी व सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले. “विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा पाठिंबा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले.”
शाळेच्या व्यवस्थापन समितीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे संपूर्ण शाळा, परिवारात आनंदाचे वातावरण आहे.