जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मार्थ रुग्णालयाच्या हृदयालय या विभागातर्फे नवजात शिशू ते १८ वर्षापर्यंतच्या बालकांना असलेल्या हृदयासंबंधित आजारांसाठी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. ३ जुलै ते ५ जुलै २०२३ दरम्यान हे शिबिर असून त्याकरीता ३ व ४ जुलै रोजी नावनोंदणी करणे अनिवार्य आहे.
अनेक बालकांच्या हृदयाला जन्म:च छिद्र असण्याची समस्या दिसून येते. जरी ही समस्या वेळीच ओळखली आणि गरजेनुसार एएसडी/व्हीएसडी किंवा पीडीए या शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टरांद्वारे करुन घेतल्यास त्यांचे भविष्य खुप चांगले असते. या दुरदृष्टीने हृदयालयातर्फे बालकांसाठी हृदयविकार निवारण व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले आहे.
या शिबिराकरीता खास वाडिया हॉस्पिटल येथील इंटरवेंशनल पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ.श्रीपाल जैन हे येणार असून ते बालकांवर उपचार करणार आहे. रुग्णांनी सोबत येतांना आधार कार्ड तसेच पिवळे व केशरी रेशन कार्ड घेऊन यावे असे आवाहन हृदयालयातर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी मार्केटिंग विभागप्रमुख रत्नशेखर जैन यांच्याशी ८००७७०५१३७, ७०३०५७११११, ०२५७-२३६६७८८ या क्रमांकावर संपर्क साधावा.