जळगाव (प्रतिनिधी) : – येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या उपस्थितीत प्रा. वेलचंद होले यांच्या हस्ते सपत्नीक गणरायाची स्थापना करण्यात आली. महाविद्यालयामध्ये श्री गणेश उत्सव विद्यार्थी समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये नितेश पाटील, तेजस पाटील, शुभम खर्चे, पल्लवी पखाले, जान्हवी बोरसे, दिव्यांशु येशी, प्रथम शेटे, गणेश कोलते, यश नारखेडे, नेहा पवार, सौरभ वानखेडे, अनंत नारखेडे, सारंग पाटील व प्रज्ञा जंजाळ या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रा. नकुल गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी समिती कार्य करीत आहे.


गोदावरी कृषी संकुल परिसरात गणरायाचे जल्लोषात आगमन
जळगाव – डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन झाले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. शैलेश तायडे यांच्या हस्ते बाप्पाची स्थापना करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. गणेशोत्सव निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धांचे देखील आयोजन केलेले आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी समिती नेमण्यात आली आहे.
गोदावरी आयएमआर येथे पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना
सावदा – येथील गोदावरी आयएमआरमध्ये पर्यावरणपूरक श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. यावेळी ढोलताशाच्या गजरात गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात जल्लोषात स्वागत करण्यात आले. संचालक डॉ.प्रशांत वारके यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचार्यांनी उपस्थित राहून गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने परिसर दुमदुमला होता.
डॉ.वर्षा पाटील इन्स्टीटयुट ऑफ मॅनेजमेंट मध्ये बाप्पाचे आगमन
भुसावळ – येथील डॉ. वर्षा पाटील इन्स्टीटयुट ऑफ मँनेजमेंट मध्ये लेझीम व ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले. यावेळी फक्त मुलींनी गणपती बाप्पा मोरया जयघोषात ढोलताशाच्या गजरात पर्यावरणपूरक शाळू मातीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. संचालिका डॉ. निलीमा वारके, प्रा डोंगर यांच्या हस्ते गणपती स्थापना, पूजा करण्यात आली. प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.









