जळगाव (प्रतिनिधी):-दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी एस.एस.व्ही.पी.एस., धुळे येथे तायक्वांदो, कराटे व वूशू या खेळांच्या विभागीय स्तरावरील निवड चाचण्या आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या निवड चाचणीत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील दोन विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या संघात आपली निवड निश्चित केली आहे.

यामध्ये कु. पूर्वा नारायण चौधरी (तृतीय वर्ष – AI&DS) हिची तायक्वांदो या खेळासाठी निवड झाली आहे. ती दि. १६ ते २० मार्च २०२६ दरम्यान फकीर मोहन विद्यापीठ, ओडिशा येथे आयोजित अखिल भारतीय विद्यापीठस्तरीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
तसेच कु. काजल कैलास सोनवणे (तृतीय वर्ष – AI&DS) हिची कराटे या खेळासाठी निवड झाली असून ती दि. १७ ते २१ मार्च २०२६ या कालावधीत संजीव अग्रवाल ग्लोबल एज्युकेशनल युनिव्हर्सिटी, भोपाळ (मध्य प्रदेश) येथे होणाऱ्या दक्षिण–पूर्व झोनल विद्यापीठस्तरीय कराटे स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या दोन्ही विद्यार्थिनींच्या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, क्रीडा संचालक डॉ. जयंत जाधव, विभाग प्रमुख तसेच शिक्षकवृंद यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
सदर यशाबद्दल दोन्ही विद्यार्थिनींचे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर, डॉ. वर्षा पाटील मॅडम (सचिव), डॉ. केतकी पाटील मॅडम (सदस्य), डॉ. वैभव पाटील सर (डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील सर यांनी अभिनंदन केले.









