फूड एक्स्पोमधून नवनविन पदार्थांची ओळख
जळगाव (प्रतिनिधी ) – वैविध्यपूर्ण आणि निरनिराळ्या चवींच्या पदार्थांचा मेळा आज शनिवार, दि.२७ रोजी डॉ.उल्हास पाटील अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयात भरला होता… निमित्त होते गोदावरी फूड एक्स्पो २०२२ चे… यातून नवनविन पदार्थांचे ओळख विद्यार्थ्यांनी मान्यवरांना करुन दिली.
गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, डायरेक्टर ऑफ एज्युकेशन अॅण्ड रिसर्चचे डॉ.ए.पी.चौधरी, निलॉन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजर अमित भोसले, ऑपरेशन मॅनेजर रिजवान तडवी, अन्नपूर्णालयमचे डी.टी.राव यांची विशेष उपस्थीती होती. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून दिपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले.
या फूड एक्स्पोच्या माध्यमातून नवनविन पदार्थ लाँच करण्यात आले. इएलएपी इंचार्ज आर.जे.शैंदाणे यांनी प्रास्ताविक केले. बुधवार दि.३१ ऑगस्टपर्यंत हे प्रदर्शन खुले असणार आहे. याप्रसंगी डॉ.उल्हास पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डॉ.ए.पी.चौधरी यांनी मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.