गोदावरी फाऊंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयात सामूहिकरित्या स्वातंत्र्य दिवस साजरा
जळगाव – आज आपण ७७ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत. आजचा हा दिवस अनेक क्रांतीकारकांनी दिलेल्या बलिदानामुळे तसेच त्यांच्यातील एकता आणि सहकार्याच्या भावनेमुळे पाहू शकतो. हे सर्व टीमवर्कमुळेच शक्य झाले. कारण स्वातंत्र्याचा प्रवास सोपा नव्हता. असेच टिमवर्क आपल्या गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील सेवेतूनही दिसून येते. येथील नर्सिंग स्टाफ, निवासी डॉक्टर्स, तज्ञ डॉक्टर्स या सर्वांच्या एकत्र येण्यामुळे रुग्णालयाची प्रगती झाली आहे. दररोज एक पाऊल चला, म्हणजे तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात अस समजा आणि एकत्रित येवून काम केले तर तुम्ही स्वत:चीच प्रगती नव्हे तर देशाचीही प्रगती कराल, असे प्रतिपादन माजी खासदार तथा गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी केले.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथी व फिजीओथेरपी महाविद्यालया यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ.पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, मेडिकल सुपरिटेडेंट डॉ.प्रेमचंद पंडित, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन एस आर्विकर, डॉ.माया आर्विकर, डॉ.अमृत महाजन, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.विशाखा वाघ, संचालक शिवानंद बिरादर, प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे, होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.डी.बी.पाटील, फिजीओथेरपीचे प्राचार्या डॉ.जयवंत नागुलकर, आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.हर्षल बोरोले, हॉर्टिकल्चरचे प्रा.सतीश सावके, क्रिडा संचालक सुरेंद्र गावंडे आदि उपस्थीत होते. मान्यवरांच्या हस्त्े ध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत म्हणण्यात आले. त्यानंतर प्रमुख अतिथी डॉ.उल्हास पाटील यांचे स्वागत डॉ.आर्विकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
पुढे बोलतांना डॉ.उल्हास पाटील म्हणाले की, सन २००८ मध्ये कॅज्युलिटी या एका विभागापासून डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाची सुरुवात झाली. आज सर्व सेवांचे दालन आणि सर्वच उपचार येथे उपलब्ध करुन देण्याच्या या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण खूप संघर्ष केला आहे आणि आज आरोग्य सेवेसाठी कुठे जायचे तर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातच हे लोकांच्या मनात बिंबले आहे, याचा सार्थ अभिमान आहे. हे सर्व टिमवर्कमुळेच शक्य झाले आहे. एकत्र येणे हाच प्रगतीचा आधारस्तंभ आहे. जेव्हा सर्वजण एकत्र येतात, त्याचा समुदाय बनतो आणि त्यांच्यातील प्रत्येकाचे विचार, कौशल्ये हे समोर येतात आणि त्यातून एक चांगले कार्य निश्चितच घडते. शिक्षण, आरोग्य सेवा आणि समाजकल्याण अशा सर्वच सेवा गोदावरी फाऊंडेशनच्या माध्यमातून दिल्या जात आहे. आणि त्यासाठी येथील प्रत्येक स्वयंसेवक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, निवासी डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ या सर्वांचा मला अभिमान आहे. आगामी काळात चांगल्या दर्जाची मेस आणि स्पोटर्स विभागात नाविण्य आणण्याचा मानसही डॉ.पाटील यांनी व्यक्त केला. याप्रसंगी सिनीयर डॉ.चंद्रेय्या कांते, डॉ.बापूराव बिटे, डी टी राव यांच्यासह संपूर्ण टिचिंग नॉन टिचिंग स्टाफ तसेच परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थीत राहून स्वातंत्र्य दिवस साजरा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुशरा खान व विक्रांत गायकवाड या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या अखेरीस लाडूचे वाटप करण्यात आले.
—–
सांस्कृतिक कार्यक्रमातून अवरतली देशभक्ती
गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील चिमुरडा विद्यार्थी चिन्मय आढे याने स्वांतत्र्य दिनानिमित्त सुंदर भाषण दिले. त्यानंतर उत्कर्ष भोसले यानेही मनोगत व्यक्त केले तर प्रा.डॉ.अमृत महाजन यांनी है प्रित यहा की रित सदा व प्रा.अनुराग मेहता यांनी मेरा रंग दे बसंती हे गीत गायिले. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी भारत हमको जान से प्यारा हे गीतावर सामूहिक नृत्य सादर केले.
—-
सावदा सीबीएसई स्कूल
सावदा येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएससी स्कूलमध्ये संस्थेचे प्राचार्या भारती महाजन तसेच सावदा पोलीस स्टेशनचे पदाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . त्यानंतर विद्यार्थ्यांनी परेड, सामूहिक सिक्कीम भाषेतील गीत गायन स्पर्धा ,भाषणे, पर्यावरण जागृती नाटिका असे कार्यक्रम सादर केले. सूत्रसंचालन लुकीता चोपडे व ज्ञानेश्वरी यांनी तर आभार अभिजीत तायडे यांनी मानले.
—–
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय
गोदावरी अभियांत्रिकी महाविदयालयामध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन एस आर्वीकर, गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या नीलिमा चौधरी, प्रा. एन जी चौधरी उपस्थित होेते. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. ईश्वर जाधव व डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केल्याबद्दल डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच डॉ.उल्हास पाटील विधी कॉलेज, गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, हरिभाऊ जावळे हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल व इतर संस्थांचे प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.