यावल तालुक्यातील साकळी येथे पोलिसांची कारवाई
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील साकळी गावातील एका गोदामातून १ लाख ६५ हजार ९७६ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात शनिवारी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकळी ता. यावल या गावात भोनक नदीच्या काठावर चिंटू वाणी याच्या गोदामामध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे, सहायक फौजदार असलम खान, सहायक फौजदार अर्जुन सोनवणे, पोलिस नाईक मोहसीन खान, अनिल साळुंखे, अरशद गवळी, मुकेश पाटील, राजेंद्र पाटील या पथकाने तेथे छापा टाकला. त्यानुसार संशयित आरोपीकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.