पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या गो.से.हायस्कूलला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन अंतर्गत तालुकास्तरीय शाळा मूल्यांकन समितीने भेट देत शाळेच्या विविध विभागांची पाहणी करून तालुक्यातील सर्वोत्कृष्ट सुंदर शाळा म्हणून प्रथम क्रमांकाने निवड केली. तालुकास्तरीय त्रिसदस्यीय समितीने पाचोरा तालुक्यातील २९ शाळांची पाहणी केली.
त्यात १५ जिल्हा परिषद शाळा तसेच इतर व्यवस्थापनातील १४ शाळांचा समावेश होता.दहा सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय त्रिसदस्यीय शाळेला भेट दिली.या समितीने विविध शाळांमधील शैक्षणिक आणि भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातील मिळवलेले यश आणि विद्यार्थ्यांसाठी शाळेत असलेल्या सुविधांचा आढावा घेत शासन निकषांप्रमाणे ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत गो.से. हायस्कूलची प्रथम क्रमांकाने निवड केली. या समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी समाधान पाटील,शिक्षण विस्ताराधिकारी श्रीमती सरोज गायकवाड, केंद्रप्रमुख विनोद धनगर यांचा समावेश होता.
या समितीने विद्यार्थी सुरक्षा समिती, सखी सावित्री समिती, विद्यार्थी तक्रारपेटी व विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निराकरण उपाय योजना त्याचप्रमाणे विद्यालयातील स्वच्छता परसबाग, क्रीडांगण,व्यायाम शाळा व क्रीडा साहित्य विभाग, दिव्यांगासाठी स्वच्छतागृह, रंगमंच, विज्ञान /गणित प्रयोगशाळा तसेच ग्रंथालय, ई लर्निंग रूम, संगणक कक्ष, चित्रकला दालन, संगीत विभाग,तांत्रिक विभाग किमान कौशल्य विभाग, सुरक्षा ऑडिट, सूचना/तक्रार व्यवस्थापन, पावसाच्या पाणी व्यवस्थापन,
घनकचरा व्यवस्थापन,विद्यांजली पोर्टलची माहिती, महावाचन चळवळ, विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभ, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यासारख्या अनेक बाबींची तपासणी करून ही निवड केली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एन.आर.पाटील, उपमुख्याध्यापक आर एल पाटील, पर्यवेक्षक ए. बी. अहिरे, ए .आर.गोहिल, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन.पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख एम.बी.बाविस्कर, केंद्रप्रमुख नितिन भालेराव, सांस्कृतिक विभाग प्रमुख महेश कौंडीण्य, उपप्रमुख आर.बी.बोरसे, क्रीडाप्रमुख एस.पी.करंदे, डी.आर. टोणपे, पी.एम. पाटील,अरुण कुमावत, सुबोध कांतायन, आर.बी. तडवी, रुपेश पाटील, स्काऊट गाईड प्रमुख आर.बी.कोळी तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी कर्मचारी आदी उपस्थित होते. शाळेने मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल सर्व येणाऱ्या सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत असून शाळेतील विद्यार्थी आणि पालक यांच्यात आनंद आणि जल्लोषाचे वातावरण आहे.