पाचोर्यात मुख्याध्यापकांच्या हस्ते दिला आदेश
पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित गो.से. हायस्कूल येथे ज्येष्ठ शिक्षक आर.बी. तडवी यांना मुख्याध्यापक एन. आर.ठाकरे यांच्या हस्ते पर्यवेक्षक पदाचा नियुक्ती आदेश देण्यात आला. याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक आर.एल. पाटील, पर्यवेक्षक ए.बी. अहिरे, ए.आर.गोहिल, सांस्कृतिक विभाग प्रमुख एम.टी.कौंडिण्य, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.
त्यांच्या या नियुक्ती बद्दल संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, मानद सचिव ऍड.महेश देशमुख, व्हा.चेअरमन व्ही.टी.जोशी, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन यांनी अभिनंदन केले आहे.