पाचोरा तालुका शिक्षण संस्थेकडून नियुक्ती
पाचोरा (प्रतिनिधी) :- तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित पाचोरा येथील गो.से. हायस्कुल या विद्यालयातील शिक्षक आर. बी. बांठिया यांना संस्थेने सेवाज्येष्ठतेनुसार पर्यवेक्षकपदी त्याच विद्यालयात पदोन्नती दिलेली आहे. संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही.टी.जोशी यांच्या हस्ते त्यांना पदोन्नती पत्र देण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक एन.आर.पाटील, उपमुख्याध्यापक आर. एल.पाटील उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्हा.चेअरमन व्ही. टी. जोशी, मानद सचिव ऍड. महेश देशमुख, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभाग शालेय समिती चेअरमन वासुदेव महाजन, सर्व सन्माननीय संचालक मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.