जळगाव एलसीबीची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातून चोरीस गेलेल्या दुचाकीच्या गुन्ह्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक संशयित आरोपी अटक केला असून त्याचा साथीदार फरार आहे. त्याला पुढील कार्यवाहीसाठी जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मेहरुण येथील रहिवासी सुरेश पंडित चव्हाण (वय ६१) यांच्या मालकीची हिरो एचएफ डिलक्स मोटरसायकल (क्रमांक एमएच १९ सीई ५७६८) शासकीय रुग्णालय, जळगाव येथून अज्ञात व्यक्तीने चोरी केली होती. या प्रकरणी सुरेश चव्हाण यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिसांना माहिती मिळाली की, सदरची चोरी रेकॉर्डवरील गुन्हेगार मोसिन शहा सिकंदर शहा (वय २५, रा. फुकटपुरा, तांबापुरा) याने केली आहे. त्यानुसार, एलसीबीच्या पथकाने मोसिन शहा याला फुकटपुरा येथून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने साथीदारासोबत दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आणि गुन्ह्यातील दुचाकी काढून दिली. मोटरसायकल जप्त करून मोसिन शहा याला पुढील कारवाईसाठी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रवी नरवाडे, राजेश मेढे, संजय हिवरकर, पोलीस हवालदार अक्रम शेख, विजय पाटील, प्रवीण भालेराव, हरिलाल पाटील, पोलीस चालक प्रमोद ठाकूर यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस हवालदार अनिता वाघमारे करीत आहेत.