जळगाव (प्रतिनिधी) :- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शुक्रवार, दि. ३ जानेवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ.गिरीष ठाकुर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन वंदन केले. सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेले अमूल्य कार्य याबाबत त्यांच्या कर्तृत्वाबाबतची माहिती शल्यचिकित्सा विभागाच्या सहयोगी प्रा. डॉ.संगिता गावीत यांनी उपस्थितांसमोर विषद केली.
या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ.जितेंद्र सुरवाडे व संजय चौधरी, डॉ.पाराजी बाचेवार, डॉ.योगिता बावस्कर, डॉ.बाळासाहेब सुरोशे, विजय पाटील, एन.के. वाघ, जी.एस.गवळी, दिलीप मोराणकर, आकाश महिरे, अनिल कापुरे, नरेश पाटील, निलेश बारी, प्रदीप पाडवी, ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र नमायते, किरण बावस्कर, विजया बागुल, प्रदीप जयस्वाल, कृष्णा भागवत, साहेबराव कुडमेथे, शिवकुमार पदरे, शालिक गोरे, उमेश टेकाळे, संजय शेळके, प्रकाश कच्छवाह, मनिषा मगरे, कुणाल पाटील, दयानंद उपरे, मोहन, किरण बावस्कर, बी. एस. पाटील आदी उपस्थित होते.