जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक कार्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रसंगी प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुमूल्य कार्याचा प्रत्येकाने अभ्यास करून सामाजिक वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन डॉ. पोटे यांनी केले. यावेळी डॉ. सोनल बोरोले, डॉ. नीता पवार, डॉ. चंद्रमोहन हरणे, डॉ. करिष्मा सोनवणे, डॉ. सुशांत निकुंभ, डॉ.स्वाती सिन्हा, राजेंद्र सपकाळ, संदीप बागुल, रवींद्र बागुल, मंगेश बोरसे, सुधीर करोसिया, आकाश पाटील, विजय बाविस्कर, भूषण निकुंभ आदी उपस्थित होते.









