जळगाव(प्रतिनिधी ) – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जळगाव येथील जी .एम. फाउंडेशनतर्फे शहरातील आरोग्य सेवकांचा सन्मान करण्यात आला.
जी एम फाउंडेशनचे अरविंद देशमुख, भूषण भोळे, अमेय राणे, शिवाजी पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. या वेळी व्यासपीठावर भाजपाचे जळगाव शहर जिल्ह्याध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक राजेंद्र मराठे, नगरसेवक महेश चौधरी, महानगर जिल्हा चिटणीस राहुल वाघ, युवा मोर्चा सरचिटणीस जितेंद्र चौंधे, मिलिंद चौधरी युवा मोर्चा उपाध्यक्ष, सचिन सोनवने, शुभम पाटील,निखिल भारंबे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.महानगर पालिकेचे शाहू हॉस्पिटल येथील डॉक्टर आणि आरोग्यसेविका यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मागील २ वर्षांपासून कोरोनाच्या वैश्विक महामारी मध्ये आपले अथकपणे योगदान देणाऱ्या आरोग्य सेवकांन विषयी कृतद्यता व्यक्त करण्याकरीता आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाने शहरातील आरोग्य सेवकांचा सन्मान करण्याचे काम जी. एम. फाउंडेशनने आज २६ जानेवारी रोजी शाहू हॉस्पिटल येथील १०० डॉक्टर आणि परिचारिका यांचा गौरव करण्यात आला.