पारोळा ( प्रतिनिधी ) – टिटवी तांडा येथील एकास गाडीचा कट मारण्याच्या कारणावरून घरात बसून त्याला व पत्नीस मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली म्हणून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिटवी तांडा येथील दादा बल्लू चव्हाण हे कामावरून घरी येत असताना गावातील श्रीराम अभयसिंग पवार यांनी त्यांना मोटरसायकलचा कट मारल्याने ते खाली पडले त्याला जाब विचारला असता त्याला ठार मारण्याची धमकी दिली त्यानंतर सायंकाळी त्यांनी फिर्यादी यांच्या घरात घुसून आरोपी श्रीराम पवार , संदीप पवार, विजय पवार, रोशन पवार, भागवत पवार ( सर्व रा – टिटवी तांडा ) यांनी फिर्यादीस व त्याच्या पत्नीस यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत मोटरसायकलचे व घरातील वस्तूंचे नुकसान केले म्हणून पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो कॉ विजय भोई करत आहेत .