जळगाव (प्रतिनिधी ) गिरणा धरणातून आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास १२३८ क्यूसेस पाणी सोडण्यात आले असून प्रशासनाने नदी अकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान ग्रामस्थांनी नदीकिनारी पशु जनावरे व इतर वस्तू नेऊ नयेत असे देखील प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
आज २८ रोजी दुपारी १२वाजता गिरणा प्रकल्पातून गिरणा नदीपात्रात 1238 क्यूसेस इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. तरी धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने गिरणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामधून पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग कमी जास्त करण्यात येणार आहे. असे गिरणा पाटबंधारे विभागामार्फत कळविण्यात आलेले आहे.