जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगांवातील मानवसेवा विद्यालयातील उपक्रमशील कलाशिक्षक शिक्षक सुनिल दाभाडे व ललवाणी काॅलेजचे कलाशिक्षक चंद्रकांत कोळी यांच्या चित्रांची थेट गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. हा जळगांवसह महाराष्ट्राचा गौरव आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून त्यांना प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक मिळाले आहे.


इंदोर येथील रडार संस्थेमार्फत लाँकडाऊन काळात सुट्टीचा सदुपयोग व्हावा म्हणून 112 देशामधिल कलाकारांना फेसबुकच्या माध्यमातून एकत्रित करुन 1149 चित्रे मागवली होती. ही चित्रे एका तासात फेसबुकवर अपलोड करावयाचे होते. रडार संस्थेचे अध्यक्ष डाॅ. आर. एस. डाकलिया यांचा हस्ते चित्रकार सुनिल दाभाडे यांना गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र व सुवर्णपदक देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापिका माया अंबटकर, मुक्ता पाटील , प्रतिभा सुर्यवंशी , सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

चित्रकार सुनिल दाभाडे यांनी या आधी सुध्दा ज्वारीच्या भाकरीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पेटींग काढली होती. ती पेटींग जगातील पहिली पेटींग ठरली आहे. यांची OMG NATIONAL BOOK OF RECORDS मध्ये नोंद घेण्यात आली आहे. सुनिल दाभाडे यांनी कोरोना काळात चौकाचौकात जाऊन स्वखर्चाने रस्त्यावर चित्र काढून जनजागृती केली आहे. कोरोना काळात गरीब लोकांना जेवण , कपडे , मास्क, लहान मुलांनाही खाऊ वाटप केले आहे.

या बहुमानाबद्दल चित्रकार सुनिल दाभाडे यांचे डायट काॅलेजचे माजी. प्राचार्य निळकंठ गायकवाड, माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, माजी उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेटकर, दिगंबर कट्यारे, विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक यशवंत मोरे, चित्रकार प्रेमकुमार सपकाळे, सचिन मुसळे, शाम कुमावत, निरंजन शेलार, अविनाश मोघे, मनोज जंजाळकर, विजय लुल्हे, पंकज नाले, अप्पासाहेब साळुंखे, रा.ना.सोनवणे, मुकेश साळुंखे, दिपक खांदे, उखर्डू साळुंखे, पंडितराव सोनवणे, सुकदेव मावळे, बाबुलाल खांदे, अनिल चव्हाण, विजय चव्हाण, विजय पवार (नाशिक), सागर पारधी, देविदास सोनवणे, अक्षय आढारे, दिपक पवार (दिल्ली) , प्रेमकुमार मावळे, संदेश मावळे, आदित्य चव्हाण , संदीप पवार, मनोज बावस्कर, गिरीश जाधव, दिनेश बाविस्कर, विकास चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.







