अमळनेर ( प्रतिनिधी ) – शहरातील मुंदडा नगरातील गजानन महाराज मंदिरासमोर बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह चांदीची मूर्ती असा २८ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. दुसरी घरफोडी जीवन ज्योती कॉलनीत झाली अज्ञात चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजा तोडून ३५ हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही चोरून नेला दोन्ही चोऱ्यांचे अज्ञात चोरट्यावर अमळनेर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत


वर्षा शरद पाटील (वय-२४ , रा. मुंदडा नगर ) कुटुंबियांसह राहतात. ८ ऑक्टोबररोजी सायंकाळी ४ ते ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० दरम्यान त्या घर बंद करून नातेवाईकांकडे गेलेल्या होत्या. अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद फोडून कपाटात ठेवलेले. २५ हजार रुपये आणि ३ हजार रुपये किंमतीची ५ भार चांदीची लक्ष्मी मूर्ती चोरून नेली. पुढील तपास पोहेकॉ रवींद्र ठाकरे करीत आहे.
मानसी राजेंद्र साळुंखे (वय-२५ , रा. संस्कृती बंगला, जीवनज्योती कॉलनी) कुटुंबियांसह राहतात. १० ऑक्टोबर रोजी ७.३० ते ११ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ दरम्यान ते घराला कुलूप लावून नातेवाईकांकडे गेले होते. अज्ञात चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजा तोडून घरातील ३५ हजार रुपये किंमतीचा एलईडी टीव्ही चोरून नेला. पुढील तपास सहायक फौजदार बापू साळुंखे करीत आहे.







