घरफोड्या करून कमावले पैसे, निवडणुकीत उभे राहून सर्वच गमावले !
एलसीबीच्या चाणाक्ष नजरेने हेरला मौजमजा करणारा चतुर गुन्हेगार
जळगाव (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखेने तालुक्यातील बिलवाडी येथील सरपंच पदाचा उमेदवार प्रवीण पाटील याला ताब्यात घेऊन ३१ घरफोड्या उघड केल्या आहेत. आरोपीने वीस गुन्ह्यांची कबुली दिलेली असून त्याच्याकडून दीडशे ग्रॅम सोने, एक स्विफ्ट कार व एक पल्सर मोटरसायकल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला तीन दिवसांपूर्वी ताब्यात घेऊन हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे. तालुक्यातील बिलवाडी या ठिकाणी नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये स्वतंत्र पॅनल व सरपंच पदासाठी उभे असलेले उमेदवार प्रवीण पाटील यांचा पराभव झाला. या उमेदवाराने निवडणुकीत चांगलाच पैसा खर्च केला. पैसा खर्च करूनही त्याचा पराभव झाला मात्र त्याच्या रुबाबात कोणताही फरक पडला नाही. त्याच्या प्रगती मागील कारणांमुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नजन पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या सहकार्याने त्याला ताब्यात घेतले.
संशयित आरोपी प्रवीण पाटील याला पोलिसी खाक्या दाखवून त्याच्याकडून दीडशे ग्रॅम सोने, एक स्विफ्ट कार, एक मोटरसायकल जप्त करण्यात आली. त्याने जिल्ह्यात तसेच जिल्हा बाहेर घरफोड्या केल्याचे कबुली दिली आहे. प्रवीण पाटील यांनी निवडणूकीत केलेला खर्च व त्याचा झगमगाट पाहून त्याच्यावर वाढलेल्या संशयामुळे तो पोलिसांच्या तावडीत सापडला. स्थानिक गुन्हे शाखेने प्रवीण सुभाष पाटील (वय ३२) याला तीन दिवसांपूर्वी ताब्यात घेण्यात आले. तीन दिवसांपासून या सर्व गुन्ह्यांची उकल स्थानिक गुन्हे करीत आहे.
या गावांमध्ये केल्या चोऱ्या
डाभरुण ता.चाळीसगाव
सार्वे ता.पाचोरा
बाहाळ ता.चाळीसगाव
मोढाळे ता.पारोळा
शिरसमणी ता. पारोळा
बोरखेडा ता. चाळीसगाव
खेडगाव ता. चाळीसगाव
रिगंणगाव ता. एरंडोल
भातखेडा ता. एरंडोल
प्रिंप्री ता. पारोळा
भोने ता.पारोळा
पळासखेडा गुजराचे ता.जामनेर
गुढे ता. भडगाव
सागवी ता. पारोळा
सुमठाणे ता. पारोळा
मुगंटी जि. धुळे
आडगाव ता. एरंडोल
जुवार्डी ता. भडगाव
विचखेडा ता.पाचोरा
बाळद ता.भडगाव
पिंपरखेड ता. चाळीसगाव
तामसवाडी ता. पारोळा
अंतुर्ली ता. पाचोरा
बोरगाव ता. धरणगाव
बामणे ता.एरंडोल