फैजपूर पोलीस स्टेशनची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- यावल तालुक्यातील आमोदा येथील घरफोडीप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनने २ संशयित आरोपीना अटक केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
फैजपूर पोलीस स्टेशन येथे दि. १३ रोजी फैजपूर पोलीस स्टेशन येथे मनोहर मुरलीधर पाटील (वय ६० वर्षे रा. आमोदा ता. यावल) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार फैजपुर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात तपास सुरु होता. आमोदा गावी पाटीलवाडा भागातील मनोहर पाटील यांच्या घरात प्रवेश करुन चोरटयांनी कपाट उघडून कपाटाची तिजोरी टॉमीने तोडून तिजोरीत ठेवलेले सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे व मुद्देमाल हस्तगत करणे बाबत पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधिक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशीत केले होते. गुन्ह्यात सचिन दगडू ठाकूर (वय २१ वर्ष), तेजस मोहन कोळी (वय २० वर्ष रा.डांभूर्णी ता यावल) यास ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे. आरोपी याच्याकडे सखोल तपास केला असता याचेकडून चोरीची खालीलप्रमाणे नमुद मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि निरज बोकील, पोहेको वसंत बेलदार, पोहेकों/ बागुल व रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकातील पोर्को सचिन घुगे, पोकों श्रीकांत चव्हाण, पोकों/प्रमोद पाटील, पोकों/महेश मोगरे यांच्या पथकाने कार्यवाही करुने गुन्हे उघडकीस आणले आहे.