एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील घरफोडी प्रकरणी दोन सराईत आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी दिनांक २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलीस हद्दीतुन अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेली चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयश्री मयुर वाणी (वय ३१, सदगुरु नगर, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचे तपासात गुन्हे शोध पथकातील पोलीस अमलदार यांनी गोपनीय माहीती घेतली.(केसीएन)सदरची चोरी ही रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत पंडीत साबळे उर्फ चोर बाप्या, आणी दोन महीन्यांपुर्वीच एमपीडीए कारवाईतून सुटून आलेला रीतेश कृष्णा शिंदे उर्फ चिच्या यानी मिळुन केली असल्याचे कळाले.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे मार्गदर्शनाखाली पोउनी दिपक जगदाळे, सफौ विजय पाटील, पोहेका गणेश शिरसाळे, पोलीस नाईक किशोर पाटील, योगेश बारी, पोका नाना तायडे, किरण पाटील, चंद्रकांत पाटील अशांनी सदर आरोपीतांना गुन्हा दाखल झाल्यावर अवघ्या २ तासांचे आत ताब्यात घेवुन त्यांना अटक केली. (केसीएन)त्यांची न्यायालयाकडुन दि.२६ पावेतो ३ दिवस पोलीस कस्टडी रीमांड घेतली.
रीमांड दरम्यान त्यांचेकडुन गुन्हयातील गेलेला संपुर्ण मुद्देमाल व जालना पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्ह्यात केलेल्या चोरीतील मुद्देमाल आहे. यासोबत चोरीला गेलेली सुमारे २० किंमतीची दुचाकी एमएच १२ बीजे ५०२५ ही सुध्दा त्यांचेकडुन हस्तगत करण्यात आलेली आहे. पुढील तपास सफौ विजय पाटील हे करीत आहे.