जळगाव ( प्रतिनिधी ) – महानगरपालिकेने सुचवलेल्या घरपट्टी वाढीला विरोध करीत रिपाइने ( आठवले गट ) आंदोलनाचा इशारा दिला आहे जळगावात काहीच सुविधा नसताना करवाढ हा जनतेवर अन्याय असल्याचे महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद करून कर योग्य मूल्यात ५० टक्के करमाफी द्या अशी मागणी रिपाईने केली आहे


रिपाईचे ( आठवले गट ) महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , महापालिकेने कर योग्य मूल्य निश्चितीबाबत नोटिसा प्रसिद्ध केल्या आहेत . त्यात सुचवलेले वाढीव कर आणि अन्य आकार मनमानी आणि अवाजवी आहेत सध्याच्या करांच्या तुलनेतच लोकांना सुविधा देण्यात महापालिका अपयशी ठरली आहे . आरोग्य , सफाई , रस्ते या सुविधांकडे नेहमी दुर्लक्षच झाले आहे . हा नवा घरपट्टी वाढीचा प्रस्ताव जनतेवर अन्याय आहे . या निवेदनाचा विचार करून नवा घरपट्टी वाढीचा प्रस्ताव रद्द करून सध्याच्या कर आकारणीत ५० टक्के करमाफी न दिल्यास रिपाई तर्फे शहरात आंदोलन करण्यात येईल .

या निवेदनावर रिपाईचे ( आठवले गट ) महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्यासह यशवंत घोडेस्वार , जिल्हा सचिव भरत मोरे, तालुका अध्यक्ष रमाबाई ढिवरे, कार्याध्यक्ष, सागर सपकाळे, महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, युवक अध्यक्ष मिलींद सोनवणे, सचिन अडकमोल, मनोहर इंगळे, बबलू शिंदे, नरेद्र मोरे, अनिल लोंढे, शोएब पिंजारी, भिमराव सोनवणे, शांताराम अहिरे, संदीप तायडे, रफिक पिंजारी, सतिष गायकवाड, ज्ञानेश्वर अहिरे, सागर पवार, हरीष शिंदे, विशाल महाले, चंद्रकांत हातागडे, सागर गायकवाड, निलेश खरोटे, ‘अक्षय मेघे, शेखर सोनवणे, अविनाश पारधे, शाहरूख पटेल, अक्षय मोरे, हितेश कोळी, अक्षय बोदडे, प्रफुल्ल वानखेडे, मानव गायकवाड, सागर खैरनार,विकी अहिरे, आकाश नाईक, वसीम पटेल, अजय अडकमोल यांच्या सह्या आहेत.







