धरणगाव येथील तक्रार निवारण सभेत १६ अर्जांवर कारवाई
जळगांव (प्रतिनिधी) : – जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या जिल्हा परिषद आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत तालुका स्तरीय तक्रार निवारण सभा दि. २१ मे रोजी धरणगाव पंचायत समिती येथे आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. या वेळी एकूण १६ तक्रारी प्राप्त झाल्या. प्राप्त तक्रारीवर उपस्थित विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत तात्काळ निराकरण करण्यात आले. यावेळी प्राप्त घरकूल योजनेबाबतच्या तांत्रिक तक्रारींवर लागलीच ऑनलाईन पद्धतीने कॅम्प लावून ताबडतोब निराकरण करण्यात आले.
या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत )भाऊसाहेब अकलाडे, शिक्षण अधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता गणेश भोगावडे, समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग, तालुका आरोग्य अधिकारी प्रमोद पांढरे, सिंचन विभागाचे अभियंता अमोल पाटील , धरणगावचे गटविकास अधिकारी किशोर वानखेडे यांच्यासह इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते.