जामनेर तालुक्यातील फत्तेपुर येथे पोलिसांची धडक कारवाई
फत्तेपूरातील सप्तशृंगी नगरमध्ये चार चाकी वाहनामध्ये घरगुती वापराचा एल.पी.जी. अवैध गॅस भरला जातो. अशी गुप्त माहिती फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरिक्षक अंकुश जाधव यांना मिळाली. त्यांनी ही माहिती तहसीदार नानासाहेब आगळे, जामनेर यांना सांगितली. तहसीलदार यांनी पुरवठा निरिक्षक नारायण सुर्वे यांना कारवाईसाठी पाठविले. त्यानुसार सहा.पो.नि. अंकुश जाधव, पुरवठा निरिक्षक नारायण सुर्वे, दोन पंच, तसेच पोलीस पथकाने आज दि.३० सप्टेबर रोजी सप्तशृंगी नगरामध्ये धाड टाकली.
संजय श्रावणे हा घरासमोर दिपक रतन वावरे (रा. लोणी) यांच्या चारचाकी इको (एम.एच. १९ डी.व्ही.६५५७) या गाडीमध्ये घरगुती वापराचा एल.पी.जी.भारत गॅस अवैध प्रकारे भरत होता. त्यांच्या कडून एकूण ३ लाख २२ हजार रुपये किंमतीचा मुददेमाल पोलीसांनी जप्त केलेला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध फत्तेपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.