पुणे ( वृत्तसंस्था ) – पुण्यात आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घरगुती वादातून पतीने पत्नी आणि सासूवर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना घडली.
या घटनेत पत्नी आणि सासू गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किरकटवाडी येथील नानानगर परिसरात घडली आहे.
अश्विनी तानाजी गायकवाड (वय-40 रा. किरकटवाडी) आणि सासूवर वार करण्यात आले आहेत. या दोघींना उपचारासाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तानाजी गायकवाड (वय-45 रा. शिवनगर किरकटवाडी) असे हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तानाजी याला दारुचे व्यसन असून जखमी अश्विनी आणि तानाजी हे मागील एक वर्षापासून विभक्त राहतात. तानाजी शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याबाबत अश्विनीने तीन वेळा तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप अश्वीनीच्या वडिलांनी केला आहे. अश्निनी आणि तिची आई दोघीही डीएसके परिसरात धुणी – भांडी करण्याचे काम करतात. आज सकाळी कामावर जात असताना आरोपी तानाजी याने दोघींवर कोयत्याने वार केले. पुढील तपास हवेली पोलीस करीत आहेत.