जळगाव ( प्रतिनिधी ) – घरगुती वापराच्या गॅसची विक्री वाहनांसाठी करून तो भरणाऱ्यांच्या मास्टर कॉलोनीतील बेकायदा पंपावर काल रात्री पोलिसांनी छापा टाकून २ आरोपींना अटक करीत त्यांचे साहित्य जप्त केले .
जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे स पो नि महेंद्र वाघमारे यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , काल त्यांना आणि पो ना सलीम तडवी , रवींद्र मोतीराया , महेश महाले , पो कॉ समाधान पाटील यांना सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांनी मास्टर कॉलनी भागात जळगाव किराणाच्या मागच्या गल्लीत अशी बेकायदा घरगुती गॅसची विक्री होत असल्याची सूचना दिली होती . त्यानंतर त्यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पो नि प्रताप शिकारे , स पो नि प्रमोद कठोरे , सहाय्यक फौजदार अतुल वंजारी व आनंदसिंग पाटील , पो ना मिलिंद सोनवणे , गणेश शिरसाळे यांना सोबत घेऊन या ठिकाणावर रात्री ९ वाजता छापा टाकला . तेथे घरगुती वापराच्या गॅसची विक्री वाहनांसाठी करण्यासाठी तो अन्य सिलिंडर्समध्ये भरणारांना पकडले होते
सिराजखान रज्जाकखान ( मास्टर कॉलनी ) व जहांगीर रफिक पटेल ( सदाशिवनगर ) अशी या आरोपींची नवे आहेत . या आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली आहे त्यांच्या ताब्यातून १९२० रुपये रोख , ६ भरलेले सिलिंडर्स , २४ रिकामे सिलिंडर्स , इलेक्ट्रॉनिक वजनकाटा , गॅस भरण्याचा पंप असे ६८ हजार ६०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे या आरोपींच्या विरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास स पो नि प्रमोद कठोरे करीत आहेत .