जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात नवलाईची घरफोडी उघडकीस आली आहे. घरातील १२ हजार रुपये किमंतीच्या वस्तूंसह चोर दुचाकी वाहनांचे आर सी बुक्स, एटीएम कार्ड, डेबिट व क्रेडिट कार्डही घेऊन गेले आहेत. एटीएम कार्ड , डेबिट व क्रेडिट कार्ड चोरून नेले असले तरी त्याचा वापर करून चोरांनी पैसे हडपल्याची नोंद मात्र या फिर्यादीत नाही.
अमरावती ( कठोरा रोड ) येथे एका शाळेत प्राचार्या म्हणून नोकरी करणाऱ्या कृष्ण मनीष कटूरीया ( वय ४६ ) यांचे जळगावात लेक सिटी , महर्षी आश्रम , मेहरूण भागात घर आहे . त्यांचे पती मनीष कटुरिया यांचे अपघातात जून २०१९ मध्ये निधन झाले आणि त्यांचा मुलगा पुण्यात नोकरी करतो . १० नोव्हेंबर २०२१ रोजी पतीच्या स्मरणार्थ करावयाचे धार्मिक विधी झाल्यावर त्या जळगावातील घर बंद करून अमरावतीला निघून गेल्या होत्या. ४ डिसेंबररोजी सायंकाळी त्यांना त्यांचे जळगावातील शेजारी सागर जाधव यांनी फोन करून त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसत असल्याचे सांगत चोरी झाली असावी असा संशय व्यक्त केला होता . त्यांनतर ७ डिसेंबररोजी रात्री त्यांनी जळगावात येऊन घराची पाहणी केली असता घरातील ८ हजार रुपये किमंतीचे २ लॅपटॉप , २ हजार रुपये किमंतीची पाण्याची मोटार , २ हजार रुपये किमंतीचा कॅमेरा १०० रुपये किमंतीची पितळी घंटी या वस्तूंसह दोन दुचाकी वाहनांचे आर सी बुक्स , एटीएम कार्ड , डेबिट व क्रेडिट कार्डही चोरांनी चोरून नेल्याचे आढळले . या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध एम.आय.डी.सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास हे कॉ रामकृष्ण पाटील करीत आहेत.