जळगाव (प्रतिनिधी) – एमआयडीसीतील प्लास्टिक मोल्डेड फर्निचर बनविणार्या स्वामी पॉलिटेक नावाच्या कंपनीतून 20 लाख 68 हजार रुपयांची रोकड चोरणार्या आरोपीने आणखी दोन घरफोड्या केल्याचे उघकीस आले आहे. एमआयडीसी पोलीसात केलेल्या तपासात गुन्ह्याची कबुली दिली आहे.
स्वामी पॉलिटेक येथील चोरलेल्या रकमेपैकी 19 लाख 78 हजार 100 रुपयांची रोकडसह संशयित आरोपी अरविंद अरूण वाघोदे (वय 22, रा. कोल्ही गोलाद, पोस्ट. लिहा बुद्रुक, ता. मोताळा, जि. बुलढाणा, ह. मु. कृष्णानगर, सुप्रिम कॉलनी, जळगाव याला अटक केली होती. वाघोदे याने 6 जुलै रोजी गोपाल दालमिल येथून 55 हजार रुपयांचा मोबाईल व पाच हजार रुपये रोख तसेच 15 जुलै रोजी भार्गव रिट्रेडींग कंपनीचा दरवाजा व कडी-कोयंड तोडून कंपनीतील 80 हजार रुपये रोख व एक हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गोपाल दालमिल मधील 55 हजार रुपयांचा मोबाईल व भार्गर रिट्रेडींग येथील 80 हजार रुपयांपैकी 35 हजार रुपये हस्तगत केले आहेत. पोलिस निरीक्षक विनायक लोकरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील, रतीलाल पवार, इम्रान सय्यद तपास करीत आहेत.