जळगाव (प्रतिनिधी ) – येथील डि मार्ट परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरटयांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, वैभव ठोसर वय ३५ नोकरी करीत असून ते पत्नी मुलाबाळांसह आदर्श नगर येथे राहतात . २८ जानेवारी रोजी त्यांना सुटी असल्याने पत्नी दीपिका यांना अमरावती येथे माहेरी सोडण्यासाठी गेले होते. २९ रोजी ते पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास जळगावात घरी आले असता घराच्या दरवाजाला कुलूप तोडल्याचे आणि काडी कोयंडा कापल्याचे दिसून आले. घरात प्रवेश केल्यानंतर कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त केलेल्या आढळून आल्या. यात २ ग्राम सोन्याची अंगठी, ५ ग्राम वजनाच्या चांदीच्या पायल आणि रोख ३० हजार रुपये मिळून आले नाही . असा एकूण ६० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला असून याबाबत रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस तपास करीत आहे.