गणेश कॉलनी परिसरातील घटना ; जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील गणेश कॉलनी परिसरातील विष्णू नगरात दुपारी फोरव्हीलरने आलेल्या तिन भामट्यांनी घरफोडी करीत दागिन्यांसह रोकड १ लाख १५ हजारांचा एकुण माल लंपास केला आहे. याबाबत जिल्हा पेठ पोलीस स्टेशन मध्ये नोद करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरातील विष्णू नगरात साईप्रभा इमारतीत जयश्री संजय होले या परिवारासह राहतात. आज सकाळी १० वाजता ते घर बंद करून कामावर गेले होते. दुपारी ३ ते ३.३० च्या सुमारास फोरव्हीलरने आलेल्या तिन भामट्यांनी त्यांचे घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याची चेन, अंगठ्या, कानातले आणि १० हजार रुपये रोख असा एकुण १ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. सायंकाळी घरी आल्यावर घडलेला प्रकार होले यांच्या लक्षात आला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात स्टेशन मध्ये नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास जिल्हापेठ चे एपीआय पवार करीत आहे.