दागिने रोकडसह २ लाखांचा ऐवज लंपास

जळगाव ;-शहरात घरफोड्या वाढल्या असून घरफोडीचे सत्र थांबता थांबत नसून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . तसेच मंगळवारी दुपारी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या घरात अज्ञात चोरटयांनी प्रवेश करून सुमारे २ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , क्रिडा अधिकारी सुजाता गंगाधर चव्हाण (५२) यांच्या जिल्हा परिषद कॉलनीतील निवासस्थानात दोन लाखाची घरफोडी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.कार्यक्रम संपल्यानंतर त्या जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयात गेले. तेथून ३.४५ वाजता जेवणासाठी घरी आल्या असता घराचा दरवाजा अर्धवट उघडा होता तर पंखा सुरुच होता. बेडरुमधील कपाटाचे ड्रावर पलंगावर पडलेले होते. तसेच ड्रावरमधील सोन्याचे दागिने गायब झालेल्या होते. त्यात ४० हजार रुपये किमतीची ८ ग्रॅमची सोन्याची अंगठी, १ लाख रुपये किमतीच्या दहा ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या, ५० हजार रुपये किमतीची १० ग्रॅमची एक सोन्याची अंगठी, ३ हजार रुपये किमतीची सोन्याची एक नथ व १ हजार रुपये किमतीची चांदीची अंगठी असा १ लाख ९३ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे उघड झाले. दरम्यान, या घटनेनंतर सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, जिल्हा पेठचे निरीक्षक विलास शेंडे, सहायक निरीक्षक महेंद्र वाघमारे व महेंद्र बागुल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी व पंचनामा केला.







