रामेश्वर कॉलनी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३० हजारांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा एकुण ५६ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सोमवारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद अशोक चित्रकथे (वय ४१ रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) हे खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतात. दि. २४ ते २६ ऑगस्ट दरम्यान त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडत घरातून ३० हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण ५६ हजारांची ऐवज चोरून नेला. हा प्रकार सोमवारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता उघडकीला आला. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रमोद चित्रकथे यांनी एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील हे करीत आहे.