एमआयडीसी पोलिसांची कामगिरी, ५ दिवस पोलीस कोठडी
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कुसूंबा येथे घरात घुसून किरकोळ कारणावरून भाऊ-बहिणीवर चॉपर हल्ला करणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी जळगावच्या शासकीय रुग्णालयाच्या परिसरातून ताब्यात घेतले आहे. त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कुसुंबा गावी शिवशाही हॉटेलचे मागे फिर्यादी अजय सुरेश सोनवणे राहतात. दि. २५ रोजी रात्री १०.३० वा.चे सुमारास अजय यांचे राहते घरासमोर संशयित आरोपी करण चंद्रशेखर पाटील (वय १९) व चेतन वसंत माळी (वय २०, रा. गणपती नगर, कुसुंबा ता.जि. जळगाव) हे विनाकारण बसुन जोरजोराने आरडा ओरड करत होते. त्यावेळी अजय सोनवणे हे त्यांना येथे बसुन आरडा ओरड करुन नका असे बोलले. त्यावरून दोघं संशयिताना राग आला. त्यांनी अजय यांच्या घरात घुसुन अश्लील शिवीगाळ करीत त्यांच्या गळ्यावर चॉपरने वार केले. तसेच जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
तसेच त्यांची बहिण सपना कैलास पवार हि भांडण सोडविण्यास गेली असता तिचे कपाळावरदेखील चॉपरने वार करुन तिला दुखापत केली होती. अजय सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदरचा हल्ला केल्यानंतर संशयित हे घटनास्थळावरुन पळून गेले होते. गुन्हा घडल्यानंतर लागलीच आरोपीतांचा शोध घेवुन त्यांना सिव्हील हॉस्पीटल, जळगाव परिसरातुन तात्काळ ताब्यात घेण्यात आले. न्यायालयात हजर केले असता न्यायमुर्ती सुवर्णा कुलकर्णी यांनी ०५ दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे.
सदरचा गुन्हा घडल्यानंतर संशयित आरोपी यांना उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत, पो.नि. जयपाल हिरे, पो.नि. विशाल जयसवाल, पो.उप. निरीक्षक रविद्र गिरासे, दत्तात्रय पोटे, स. फौ. अतुल वंजारी, अल्ताफ पठाण, सचिन मुढे, रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, सुधीर साळवे, ललीत नारखेडे अशांनी ताब्यात घेतले होते. सदर आरोपी करण पाटील याचेवर यापुर्वी एम. आय.डी.सी. पो.स्टे.ला एक गुन्हा दाखल आहे.