चाळीसगाव तालुक्यातील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील एका गावात महिला घरी एकटी असताना व कामकाज करीत असताना एका नराधमाने घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावात शुक्रवारी दि. १८ जुलै रोजी सकाळी ९ वाजता ३७ वर्षीय महिला हि घरात एकटी होती. घरातील कामे करीत असताना संशयित आरोपी सुरेश साहेबराव गायकवाड याने महिलेला जबरदस्ती करून तिच्यावर बलात्कार केला. रविवारी दि. २० रोजी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोउनि विकास शिरोळे करीत आहेत.