जळगाव ( प्रतिनिधी ) – निमखेडी शिवारातील घनश्यामनगरातून मध्यरात्री घरासमोर उभी केलेली ३० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला .
नेवरलाल दशरथ जगनित (वय-४५ , रा. निमखेडी शिवार ) कुटुंबियासह वास्तव्याला आहे. मजुरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्याच परिसरात त्याचे सासरेदेखील राहतात. कामासाठी लागणारी एमएच ३५ यू ३४६८ क्रमांकाची दुचाकी त्यांच्याकडे आहे. नेवरलाल जगनित यांनी ४ डिसेंबररोजी सासऱ्यांकडे दुचाकी पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्यांनी पार्किंगच्या ठिकाणाहून दुचाकी लांबविल्याची घटना ५ डिसेंबररोजी सकाळी उघडकीला आली. परिसरात शोधाशोध केली परंतू आढळून आली नाही. नेवरलाल जगनित यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.