अर्जेंटिना ( वृत्तसंस्था) – घरामध्ये सफाई करतांना एक व्यक्तीला घराच्या बागेत एका बाटलीत चक्क पुरुषाचे गुप्तांग सापडले . ज्यामुळे त्याला धक्का बसला आहे.

अर्जेंटिनाच्या बॅकर्समध्ये येथे राहणारी व्यक्ती बागेत साफसफाई करत होती. बागेतील गवताच्या जागी साफसफाई करतांना तिला दुर्गंध येऊ लागला. या दुर्गंधामुळे त्याने आजूबाजूला उंदीर मेला असावा असे गृहीत धरून पुन्हा बागेची सफाई करायली घेतली. पुढे त्याला बागेत एक बाटली सापडली. या बाटलीतूनच दुर्गंध येत होता. या बाटलीत चक्क पुरुषाचा प्रायव्हेट पार्ट होता. या व्यक्तीला या घटनेमुळे धक्काच बसला, त्याने लगेच माहिती पोलिसांना दिली, पोलिसांनी आता फॉरेन्सिक तपासणी सुरू केला आहे.
स्थानिक लोकांनी सांगितले आहे की, हा काळ्या जादूचा प्रकार असावा. पोलीस या परिसरातील रुग्णालयातही चौकशी करत आहे. तिथं एखादी व्यक्ती प्रायव्हेट पार्टच्या उपचारासाठी आली असावी आणि तिचा हा प्रायव्हेट पार्ट असावा, असा संशय त्यांना आहे.







