जी.एम. डायग्नोस्टिक व पॅथॉलॉजी सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी माजीमंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही
जळगाव-् (प्रतिनिधी) सेवा सप्ताहानिमित्त जी.एम. डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सर्व चाचण्या रास्त भावात करण्यात येणार असून जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी केले. जी.एम.फाऊंडेशन संचलित जी.एम. डायग्नोस्टिक व पॅथॉलॉजी सेंटरचे शहरातील गणेशवाडीतील पंचमुखी हनुमान मंदीराजवळील नानीबाई कॉम्प्लेक्स येथे माजी मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महापौर भारती सोनवणे, आमदार राजूमामा भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, मनपा स्थायी समिती सभापती अॅड. सुचिता हाडा, नगरसेगक भगत बालाणी, माजी महापौर नितीन लढ्ढा, सभागृह नेते ललित कोल्हे, ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे, माजी आमदार गुरूमुख जगवाणी, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी उपमहापौर करीम सालार, जी.एम. फाऊंडेशनचे जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार महाजन पुढे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना नाममात्र दरात सिटी स्कॅन, एक्सरे, सोनोग्राफी आणि रक्त लघवी यासह सर्व पॅथॉलॉजीच्या माध्यमातून अल्पदरात सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी जी एम हेल्थकेअर च्या मॅनेजिंग डायरेक्टर पूजा संचेती यांनी परिश्रम घेतले