मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. सोमवारी होणारा पेपर आता ३१ मार्चनंतर होणार आहे. ३१ मार्चनंतर परिस्थिती पाहून पेपरची तारीख जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बोलताना दिली आहे. सोमवारी सामाजिक शास्त्रे पेपर-२ भुगोल, या विषयाचा पेपर होता.
महाराष्ट्रामध्ये आज कोरोनाचे आणखी ११ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आता कोरोनाचे ६३ रुग्ण झाले आहेत. यातले १० रुग्ण मुंबईचे तर १ रुग्ण पुण्याचा आहे. ६३ पैकी १४ लोकांना संसर्गामुळे कोरोना झाला आहे. तर बाकीचे रुग्ण हे परदेशातून आले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
गर्दी कमी होत नसेल तर लोकल ट्रेन बंद कराव्या लागतील. शहराकडून लोकं गावाकडे जात आहेत, त्यामुळे ज्यादा रेल्वे गाड्या सोडण्याची विनंती आम्ही रेल्वे मंत्र्यांना करणार आहोत, असं राजेश टोपे म्हणाले.