पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची टीका
जळगाव : नारायण राणे यांच्याशी प्रेमाचे नाते असून ते शिवसेनेमुळे मोठे झाले आणि सेनेमुळेच रस्त्यावर आल्याची बोचरी टीका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे केली . नारायण राणे यांनी राज्यपालांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर आज २६ रोजी गुलाबराव पाटील यांनी आज बोलताना सांगितले कि देशात कोरोनाची आपत्ती आली असून राष्ट्रपती लागवट उत्तरप्रदेश दिल्ली गुजरात आदी ठिकाणीही करावी लागेल .
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकार अपयशी ठरल्याने राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करण्याची मागणी केली होती. त्यावर मंगळवारी गुलाबराव पाटील यांनी ही राजकारण करण्याची वेळ नसून आपत्तीच्या काळात एकत्र येण्याची वेळ असल्याचे मत व्यक्त केले.
शिवसेनेशी राणे यांचे जुने नाते आहे, सेनेमुळेच ते मोठे झाले अन् सेनेमुळेच ते रस्त्यावर आले असा टोलाही लगावला .







