त्रिची ( वृत्तसंस्था ) ;- १७ वर्षांच्या गतिमंद मुलावर बलात्कार करून त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी 34 वर्षांच्या आरोपीला तिहेरी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना 2019 साली घडली होती . तमिळनाडूतील त्रिचीमधल्या विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. दानिश पटेल असं या आरोपीचं नाव असून तो मूळचा गुजरातचा रहिवासी आहे. तमिळनाडूमध्ये तो दगडफोड करणाऱ्या प्रकल्पावर दानिश कामाला होता.
दानिश जिथे कामाला होता तिथून जवळच असलेल्या गावात तो राहात होता. पीडीत मुलगा हा दानिशच्या शेजारी राहात होता. दानिशने एकेदिवशी या मुलाला स्वत:छ्या दुचाकीवर बसवलं आणि त्याला अज्ञातस्थळी घेऊन गेला. तिथे त्याने मुलावर बलात्कार केला. यानंतर विकृतपणाची सगळी हद्द पार करत त्याने या मुलाच्या गुदद्वारामध्ये झाडाची मुळं खुपसली होती. दानिशच्या विकृतपणामुळे हा मुलगा भयंकर जखमी झाला होता. या मुलाला पुदुकोट्टई इथल्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
पीडीत मुलाने 18 दिवस मृत्यूशी झुंज दिली, मात्र डॉक्टर त्याचा जीव वाचवू शकले नाहीत. दिवसेंदिवस पीडीत मुलाची प्रकृती ढासळत गेली आणि सगळे अवयव निकामी होत गेल्याने त्याचा मृत्यू झाला. दानिशने ज्या दिवशी बलात्कार केला होता, त्याच दिवशी त्याला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दानिशविरूद्ध आरोपपत्र दाखल केलं होतं. दानिशविरूद्ध पोक्सो कायद्या अंतर्गत प्रामुख्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय गतिमंद तरुणाच्या मानसिक अवस्थेचा गैरफायदा घेणे, इजा होईल असा लैंगिक छळ करणे, अपहरण करणे आणि हत्या करणे या गुन्ह्यांसाठीही पोलिसांनी दानिशविरोधात खटला दाखल केला होता.
गुरुवारी जिल्हा न्यायाधीश आर. सत्या यांनी दानिशविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आपला निर्णय जाहीर केले. त्यांनी 30 हजार रुपयांच्या दंडाशिवाय पोक्सो कायद्यातील 3 कलमांच्या तरतुदीनुसार दानिशला तिहेरी फाशीची शिक्षा सुनावली. मुलाच्या कुटुंबाला 6 लाखांची मदत दिली जावी राज्य सरकारने याव्यतिरिक्त 3 लाखांची मदत या कुटुंबाला करावी असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.