न. प.च्या नियोजन अभावी शहरवासीयांना पाण्याची टंचाई

चाळीसगाव (प्रतिनिधी ) ; – धरणात मुबलक पाणीसाठा असताना देखील सत्ताधारी गटात ताळमेळ नसल्याने चाळीसगाव शहराला 4 ते 5 दिवस पाणी येत नसल्याने नगरपरिषद कारभाराविरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
चाळीसगाव शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन दर महिन्यात एक किंवा दोन वेळेस फुटत असते . त्यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा नियमित होत नाही. तर पाईपलाईनचे काम करण्यासाठी नगर परीषदेला पाच सहा दिवसाचा कालावधी लागतो.त्यानंतर पाईपलाईन दुरुस्त झाल्यानंतर शहराचे पाणी सोडण्याचे नियोजन कोलमडून शहर वाशीयाना पाण्यासाठी वणवण करावी लागत असते .धरणात पाणी असूनही शहरातील नागरिकांना ५ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने शहर वाशीयाना पाण्याचा कमालीचा तुटवडा जानवत असतो. एकीकडे गिरणा धरणात मुबलक पाणीसाठा असताना नगर परीषदेच्या वतीने शहराला हिवाळा असूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नसेल तर उन्हाळ्यात नगर परीषदेच्या वतीने किती दिवसाआड शहराला पाणीपुरवठा होईल हा प्रश्न अनुउत्तरीत राहतो. नगर परीषदेचे योग्य नियोजन नसल्याने मुळे तसेच प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा अंकुश नसल्यामुळे शहरातील नागरिकांना पाण्याचा समस्येला सामोरे जावे लागत असल्याने नगरपरीषदेच्या कारभारा विरोधात शहर वाशीयांमध्ये तीव्र नाराजी आहे.







