जळगाव ;- जिल्हा मनियार बिरादरीची २१वी वार्षिक सर्वसाधारण सभा बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांच्या अध्यक्षतेखाली शिरसोली येथे झाली. या सभेत विविध १२ ठराव मंजूर करण्यात आले..
या निमित्ताने मुलगी बघायच्या कार्यक्रमातच लग्न लावणाऱ्या तीन नवदांपत्याचा व त्यांच्या पालकांचा गौरव बोहरा, मेमन व मुस्लिम बिरादरीतर्फे करण्यात आला. फारुक शेख, सय्यद चाँद, हारून शेख, ताहेर शेख, आबिद शेख, अल्ताफ शेख, मुश्ताक शेख, रऊफ टेलर, अजिज शेख, हकीम चौधरी, असलम शेख, शब्बीर शेख उपस्थित होते. कार्यक्रमासाठी इब्राहिम, नबी मिस्तरी, खलील शेख, करीम शेख, शाकीर शेख, तौफिक शेख, गुलाम शेख, समीर शेख, आबिद शेख, सलीम शेख, साबीर शेख यांनी सहकार्य केले.








