जळगाव :;- शहरातील विवाहितेला कोल्ड ड्रिंक्समध्ये काही तरी टाकल्यावर ते पाजून तिची शुध्द हरपल्यावर तिच्या संमतीविना अत्याचार केला. नंतर अत्याचार करतांनाचे फोटो, व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्यासह पोलिसात तक्रार दिली तर जीवे मारण्याची व आत्महत्येची धमकी देवून २०१७ ते २०२० सलग तीन वर्ष विवहितेवर विविध ठिकाणी अत्याचार केले . आरोपी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निंभोरा शाखेचा मॅनेजर अशोकनाथ सिताराम शर्मा ( रा. जयश्री अपार्टमेंट नवीमुंबई वुलवे ) याच्या विरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.








