जळगाव ;- शहरातील गांधी मार्केट मध्ये असणाऱ्या गाळे क्रमांक ६ व ७ येथे शिवसागर क्रिएशन येथे लॉकडाऊन काळात कापड विक्री बंद असतांना हे दुकान सुरु असल्याचे लक्षात आल्याने आज मनपा उपायुक्त संतोष वाहुळे , अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच एम खान, लिपिक विजय देशमुख , संजय ठाकूर यांच्या पथकाने सीलची कारवाई आज दुपारी करण्यात आली आहे. २३ आणि २४ मे रोजी चोरून – लपून गांधी मार्केटच्या बेसमेंटमध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर शिवसागर क्रिएशन येथे बंदी असतानाही ते दुकानात रेडिमेड कपड्यांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याने आज दुपारी मनपाच्या पथकाने हि सीलची कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे . दरम्यान हे दुकान मालक जगदीश हसमतराय फैलानी यांचे असल्याचे सांगण्यात आले .
शिवसागर क्रिएशन सुरु असल्याचे हे छायाचित्र