जळगाव – घराचा दरवाजा उघडा ठेवल्यामुळे अज्ञात चोरट्याने संधी साधून घरातील एलईडी टीव्ही , मोबाई आणि पाकिटामधील रोकड लंपास केल्याची घटना लक्ष्मीनगर येथे आज सकाळी उघडकीस आली असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, लक्ष्मीनगरात गणेश बळीराम सपकाळे (वय-38) हे श्रीराम कन्याशाळेजवळ वास्तव्यास आहेत. रात्री 10 वाजेच्या सुमारास जेवण करून कुलर लावून ते कुटुंबियांसह झोपले. यादरम्यान त्यांनी दरवाजा उघडा ठेवला. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात चार्जिंगला लावलेला 8 हजाराचा मोबाईल, 12 हजार रूपयांचा एलईडी टीव्ही आणि पाकीटात ठेवलेले 970 रूपये असा ऐवज लांबविला. घरातील उठल्यावर घरातील मोबाईल, टीव्ही तसेच पैशांचे पाकिट नसल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार त्यावरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन मुंडे करीत आहेत.