कंजरवाडयातिल नागरिकांचा सवाल
जळगाव – जळगाव येथील कंजरवाडा (जाखनी नगर) भागातील रविवारी दि.24रोजी संध्याकाळी सहा वाजता 65 वर्षीय व्यक्तीला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली रुग्ण आढळता बरोबर प्रसासन खडबडून जागे होतात आणि परिसर पिजून काढतात पण कंजर वाडा परिसरात प्रशासन, मनपा, पोलीस, नगरसेवक, एक अधिकारी सुद्धा या भागात फिरकला नसल्याने कंजरवाड्यात प्रशासनाकडून उदासीनता दिसून आली
जिल्हाधिकारी साहेब फक्त पत्रे लावून कोरोनाला आळा बसणार का? असा सवाल परिसरातील नागरिकांनी सोमवारी केला आहे. कंजर वाडा हा झोपडपट्टी भाग असून तेथील गोरगरीब,हातावर पोट असणारे लोक धास्तावले आहे.जळगाव शहरातील इतर ठिकाणी कोरोना रुग्ण आढळताच पूर्ण यंत्रणा कामाला लागती मग कंजर वाड्यात असा भेदभाव का? प्रशासनाकडून फक्त अर्धवट पत्रे लावून दिले असे का? पत्रे लावले म्हणजे कोरोनाला आळा बसला का ?जिल्हाधिकारी साहेब एकदा तरी कंजर वाड्यात येऊन बघा काय उपाययोजना केल्या त्या आपल्याला दिसुन येईल कंजर वाडा या भागातील रुग्णाच्या गल्लीत जर पत्रे लावून कोरोना जात असेल तर जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्त भागात सगळीकडे फक्त पत्रे लावून कोरोनाला हरवले जाणार का?असा संताप ही काहींनी बोलून व्यक्त केला . कंजर वाड्यातील वृद्ध व त्याची पत्नी रुग्ण हे पुणे येथे जाऊन आले असे त्या सदरील भागातील नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे संबंधित अधिकारी डॉक्टर अत्ता पावेतो दिसत नाही दुसऱ्या भागात प्रशासन अति उत्स्फूर्तपणे काम करत दिसत असून या भागात का जनावरं रहातात का? असा सवाल कंजरवाडा भागातील नागरिक करीत आहे
थातुर मातुर सर्व्हेक्षण
सोमवारी अंगनवाडीच्या काही महिला आल्या पण फक्त काही घरातील व्यक्तींना काही खोकला,ताप, डायबिटीस आहे का ,बस असे बोलून थातूर मातूर नाव घेऊन पुढे काही घरात विचारपूस केली तर काही घर सोडून देत आहे या परिसरात 2 ते 3 हजार लोकवस्ती असून फक्त कमी प्रमाणत अंगणवाडीच्या सेविका अपूर्ण सर्व्हेक्षण तसेच दोनच लोक सोमवारी सिनिटायझर करून अर्धा भाग सोडून निघून गेल्याची ओरड परिसरातील नागरिक करीत आहे.
फक्त पत्रे लावले बस पुढें काय?
आतापर्यंत ना कटेन्मेंट झोन किती क्रमांक आहे याचा ना फलक, ना बंदोबस्त पोलीस कर्मचारी,या पत्राच्या बाजूकडून नागरिक बिनदस्तपणे ये जा करीत आहे ,तर काहींनी तर पत्राच्या जवळच दुचाकी लावून त्या रुग्णच्या घरी ये जा करीत असल्याचे प्रकार घडत आहे, त्याना रोखणार तरी कोण ?असा प्रश्न उपस्थित होत आहे हा भाग वाऱ्यावर सोडून दिला असून अजून कोरोना रुग्ण होण्याची वाट पाहून कोरोनाला आमंत्रण देत आहे का? फक्त पत्रे लावले म्हणजे झाला का कटनमेंट झोन?काही नियम अटी आहे की नाही?त्या परिसरात ना कोणी मास्क लावत आहे ,ना सोशल डिस्टनशिंग पाळत आहे ? जिल्हाधिकारी साहेब आपल्या टीम सोबत एकदा तरी कंजर वाड्यात या असे निमंत्रण ही नागरिकांनी दिले आहे.
पूर्णपणे कंजर वाडाच सॅनिटायझर करण्यात यावे, रुग्णाच्या संपर्कात असणाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात यावी यासाठी *प्रशासकीय यंत्रनाने त्वरित कंजर वाड्यात कोरोनाबाबत जनजागृती व उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे