मुंबई ( वृत्तसंस्था ) ;- गेली तीस वर्ष मी सामाजिक काम केले आहे, मात्र आमच्या समाजातील पूजा चव्हाण प्रकरणी भाजप , समाज माध्यम आणि प्रसार माध्यमांनी घाणेरडे राजकारण केलत्याचा आरोप वर्षा बंगल्याबाहेर आलेल्या माजी वनमंत्री संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत केला असून आपण मुख्यमंत्र्याना राजीनामा सुपूर्द केला आहे. याप्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे करून याचा तपास करावा सत्य बाहेर येऊ द्या अशी आपली भूमिका राहिली असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले . भाजपकडून अधिवेशन चालू देणार नाही हि त्यांची भूमिका असून यावर राजकारण केले जात असल्याचे ते म्हणालेयाप्रकरणाचा तपास पारदर्शकपणे व्हावा अशी अपेक्षा संजय राठोड यांनी यावेळी व्यक्त केली .







