रूग्ण संख्या पोहोचली 871 वर
जळगाव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आज आणखी 71 रूग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या 871 वर जाऊन पोहोचली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहर 24, भुसावळ 8, अमळनेर 3, चोपडा 6, पाचोरा 1, धरणगाव 1, यावल 4, एरंडोल 1, जामनेर 2, जळगाव ग्रामीण 2, रावेर 4, पारोळा 8, चाळीसगाव 1, मुक्ताईनगर 5, अन्य 1 असे एकुण 71 रूग्ण कोरोनाग्रस्त आढळले आहेत.१०० हुन अधिक जणांचा मृत्यू झाला आहे .