जळगाव : – शहरातील ब्रुक बॉण्ड कॉलनीत राहणाऱ्या तेरा वर्षाच्या विद्यार्थ्याने आज दुपारी एक वाजता घरात दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुदैवी घटना जळगाव शहरात घडली. असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे . या विद्यार्थ्याने आत्महत्या का केली याची माहिती स्पष्ट झालेली नाही .
जळगाव शहरातील ब्रुक बॉंड कॉलनीत राहणारे कैलास व रत्ना भोई यांचा मुलगा भूषण भोई (13) असे आत्महत्या करणा-या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे आईवडील चहा नास्त्याची गाडी लावून चरितार्थ चालवतात. घरात कुणीही नसल्याची संधी साधून भुषण याने आत्महत्या केली. जिल्हा पेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.








