जळगाव ;- बेकायदेशीर तलवारी बाळगून गंभीर स्वरूपाच्या गुन्हा करण्याच्या तयारीत असणाऱ्या तिघांच्या मुसक्या एलसीबी च्या पथकाने आवळल्या असून दोन तलवारी हस्तगत करण्यात आल्या आहे . पोलीस निरीक्षक .किरणकुमार बकाले यांना गोपनिय मिळाली की, बोदवड शहरात जामठी रोड व
बडगुजर वाडा परीसरात तीन तरुण त्याचे कब्जात बेकायदेशिर दोन तलवारी बाळगुन काहीतरी गंभीर गुन्हा | करण्याचे बेतात आहे त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ.श्री.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, विवेक लावंड यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार क महाजन, शरिफ तडवी, युनुस शेख, विनोद पाटील , रणजित जाधव यांना तात्काळ रवाना केले होते.


मिळालेल्या माहिती नुसार बोदवड शहरात दोन तरुण सोबत संशईत रित्या फिरतांना मिळुन आले असता त्यांचे कब्जात दोन तलवारी मिळुन आले त्याने नाव त्यांनी १) अक्षय भास्कर दांदडे वय – १९ | रा.जामठी रोड,बोदवड जि.जळगाव २) आनंद उर्फ नाना गोपाळ बडगुजर वय – २३ वर्षे रा.बडगुजर
वाडा,बोदवड जि.जळगाव ३) विकी अशोक साबे वय – २१ रा.जामठी दरवाजा,बोदवड असे सांगीतले.१) अक्षय भास्कर दांदडे वय – १९ रा.जामठी रोड,बोदवड जि.जळगाव २) आनंद उर्फ नाना गोपाळ बडगुजर वय – २२ वर्षे रा.बडगुजर वाडा,बोदवड जि.जळगाव , ३) विकी अशोक साबे वय – २१ रा.जामठी दरवाजा,बोदवड हे जळगाव जिल्हयात शस्त्र साठा बाळगणे बाबत प्रतिबंधक केलेले असतांना देखील त्यांनी बेकायदा शस्त्र जवळ बाळगल्याने त्यांचे विरुध्द भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये बोदवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







